भविष्यकथनामध्ये कुंडली, हस्तरेषा, चेहरा, नाडीपरीक्षा यांच्या इतकेच महत्त्व संख्याशास्त्रानुसार सांगितल्या जाणाऱ्या भविष्यालाही असते. जन्मतारखेनुसार ठरवला जाणारा तुमचा मूलांक म्हणजे तुमचे व्यक्तिमत्वच असते. त्यावरून तुमचा स्वभाव सांगता येतो.

मूलांक १: सावध राहा

ज्या व्यक्तींचा मूलांका एक आहे, त्यांनी आगामी आठवड्यात सावध राहणे हितकारक ठरणार आहे. आपल्या मनातील गोष्ट कथन केल्याने दुरावलेले नातेसंबंध पुन्हा एकदा जोडले जाण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी असलेले संबंध दृढ होतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्यांनी काळजी घ्यावी.

लांक २: यश देणारा आठवडा

ज्या व्यक्तींचा मूलांक दोन आहे, त्यांना आगामी आठवडा यशदायक ठरेल. विद्यार्थ्यांना हा सप्ताह उत्तम आहे. आठवड्याच्या अखेरीस शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसांत प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे.